Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंना घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे आणि पायलट सुखरुप

Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या […]

Kalyan Loksabha I कल्याण लोकसभेत विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे […]

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे […]