BARTI I बार्टीच्या संशोधक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांविषयी दुजाभाव का? माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांचा सवाल
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे ७६१ संशोधक विद्यार्थी पात्र ठरले. परंतु आजतागायत अधिछात्रवृती (फेलोशिप) मिळालेली नाही. त्याच वर्षी सारथी व महाज्योती अंतर्गत अनुक्रमे ८५१ व १२३६ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली. फक्त बार्टीचे विद्यार्थी वंचित ठेवले गेले आहेत. बार्टीचे सर्व पात्र विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात….