Nana Patole I काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक, मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन
साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच…