माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दुध प्या दिर्घायुषी व्हा !!!
या दुध जागृती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन
नागपुर : प्रतिनिधी : प्रविण बागडे
दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती असून दुधाचे मानवी आरोग्याचे दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतीक दुध दिवसाचे औचित्य साधून आयोजित दुध जागरुकता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, अभियानाचे संयोजक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने व मुख्य वक्ते तथा अधिष्ठाता दुग्धतंत्रज्ञान डॉ. प्रशांत वासनिक उपस्थित होते.
प्रास्तविक पर भाषणात या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संयोजक तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. भिकाने यांनी दुध प्या दिर्घायुषी व्हा ! या टॅग लाईन खाली राज्यभर दुध जागरुकता अभियान हे पुढील वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अभियानाचा मुख्य उद्देश अलिकडील काळात दुधाबद्दल लोकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दुर करून तसेच फास्ट फुडकडे वळलेल्या तरुणाईस दुधाचे महत्व सांगून राज्यात दुधाचे सेवन वाढण्यासाठी जागरुकता निर्माण करणे असल्याचे सांगीतले.
राज्यात दर डोई दुधाचे सेवन हे ३२९ ग्रॅम असून देशाच्या सरासरी ४५९ ग्रम पेक्षा खूप कमी असल्याचे सांगीतले. दुधाचे सेवन वाढले तर दुध दर वाढीस चालना मिळून दुध उत्पादन वाढीस चालना मिळून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.
या प्रसंगी ऑनलाईन पध्तीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे डॉ. नितिन कुरकुरे यानी जागतीक दुध दिवसाचा इतिहास सांगून महत्व विषद केले. मुख्य वक्ते दुग्धतंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक यांनी त्यांच्या भाषणात दुधाचे घटक, दुधाच्या प्रत्येक घटकाचे मानवी आरोग्यासाठी महत्व व फायदे सांगीतले.
गाईच्या व वेगन दुधातील फरक विषद करतांना दुधात १३ नैसर्गिक पोषकतत्वे व वेगन दुधात ५-१० वनस्पतीजन्य पोषकतत्वे असुन ते उत्पादक कंपनी नुसार त्याचे प्रमाण बदलत असतात. गाईच्या दुधातील स्निग्ध पदार्थ, प्रथिने, विटामिन्स व खनिजे पचनास हलके असुन त्यांचे पोषणमुल्य अधिक असल्याचे प्रमाण सांगितले.
ए वन व ए टु दुध हे विपणन धोरण असल्याचे व भारतात उपलब्ध जनावरांचे दुध हे ए टु प्रकाराचे असल्याचे एन. बी. ए. जी. आर, करनाल येथील राष्ट्रीय संस्थेनी संशोधनाअंती जाहीर केल्याचे नमुद करुन आपल्याला ए वन दुधाची भिती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगितले.
दुधामुळे जीवनशैलीचे आजार होतात हे मिथक असुन डॉ. मोहन, मधुमेह रोग तज्ञ, चेन्नई यांच्या संभाव्य शहरी ग्रामीण महामारी विज्ञान अभ्यासगट यांनी पाच महाद्विपातील, २७ देशातील जवळपास २ लक्ष लोकांवर सतत २० वर्ष केलेल्या संशोधनाचे निष्कर्षानुसार दुधाच्या नियमित सेवनाने मधुमेह, ह्रुदयरोग व इतर जीवनशैली चे आजारापासुन संरक्षण व पोषण सुधारण्या सोबतच मृत्युदर कमी होतो असे नमुद केले.
सदरील व्याख्यानास माफसू अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन समितीचे सचिव डॉ. गजानन नारनवरे व डॉ. प्रविण बनकर तर आभार प्रदर्शन डॉ. लांडगे यांनी केले.
विद्यापीठा अंतर्गत सर्व दहा पशुवैद्यक, दुग्धतंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान महाविद्यालये, तीन कृषि विज्ञान केंद्र तसेच संलग्नीत ७२ दुग्धव्यवस्थापन पदविका शाळातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यानी राज्यभर सामुहीक दुध सेवन, सेल्फी वुईथ ग्लास ऑफ मिल्क, प्रबोधनपर व्याख्याने, रॅली, प्रकाशने असे १०० उपक्रम राबविले.