कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी
राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन
प्रतिनिधी-कारंजा
गत महिन्यात कारंजा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू असून कारंजा शहरातील विद्युत पुरवठा दिवसातुन अनेक वेळा व रात्री बेरात्री खंडित होत असून याचा त्रास शहरातील सर्व नागरिकांना होत आहे,या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे मार्गदर्शना खाली कारंजा महावितरण अभियंता राजपूत यांना ,२८ मार्च रोजी निवेदन देऊन कारंजा शहरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दखल घेऊन शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली यावेळी मेहबूब टेलर,राकापा अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख,नगरसेवक सै मुजाहिद, शारीक शेख, अ रशीद,उस्मान खान,मुन्नाभाई ठेकेदार, सदीम नवाज,शाहिद अहेमद,मोहसिन शेख,युसूफ खा मौलाना,मो साकीब,एम डी शद्दु, शेख रेहान,जुनेद शा, शहबाज खान आदी उपस्थित होते.