पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले , टाकाची वाडी या ठिकाणी करण्यात आले. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी नेतृत्व आदिवासी समाजाने स्वीकारले आहे.
येथील गावचे मुख्य निवासी नारायण हरी वाघमारे व सर्व ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडी युवा मध्ये जाहीर प्रवेश केला. व वंचित बहुजन आघाडीला ताकत देण्याचे काम केले. या कार्यक्रमाला सदस्य मारुती शिंदे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र दिव्यांग सेलचे समन्वयक ऍड: सचिन गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष पुष्पांजली सकपाळ ,पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड, महासचिव प्रदीप गायकवाड, महिला अध्यक्ष पेण तालुका अश्विनी ठाकूर, महासचिव अंकिता शिंदे, दीप्ती यादव , शशिकला गायकवाड, अंकिता जंगम, रेखा सिंग, नरेश गायकवाड, सुनील शिंदे तसेच शाखा कमिटीचे अध्यक्ष विजय गजानन वाघमारे, उपाध्यक्ष संतोष बारके, महासचिव रोशन रोहिदास पवार, सचिव प्रवीण लक्ष्मण नाईक, संघटक बारक्या जनार्दन वाघमारे, सल्लागार भाऊ जनार्दन वाघमारे, सदस्य समीर गणपत नाईक, कैलास गोविंद पवार चंद्रकांत सखाराम वाघमारे आदींसह ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले.
भारतीय संविधानाने आम्हाला न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत.
त्यामुळे आम्ही आंबेडकर घरण्यासोबत एकनिष्ठ राहू, असे नारायण वाघमारे व प्रवेश कर्त्यांनी स्पष्ट केले. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या समाजाला दिशा दाखवणारे नारायण हरी वाघमारे यांच्यावर विश्वास ठेवून गावचे सर्वांनी वंचित बहुजन आघाडी टाकाची वाडी, केळंबी, खारपाले येथील ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला असल्याचे यावेळी पक्ष प्रवेश कर्त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मारुती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. शेवटी आभार सचिन कुमार गायकवाड यांनी व्यक्त केले.