Sunil Tatkare I रायगडच्या राजकारणातील किंगमेकर सुनिल तटकरे 

 

सुनिल दत्तात्रेय तटकरे एक राजकीय योध्दा. मुत्सद्दी योध्दा हीच उपाधी सुनिल तटकरेंसाठी सार्थ ठरावी अशीच त्यांची एकूणच सामाजिक राजकीय कारकीर्द राहिली आहे.

 

रायगडच्या राजकारणात सुनिल तटकरे नेहमीच किंगमेकर राहीले. त्यांनी मागील तब्बल तीन दशके राजकीय मैदान गाजविले. अलौकिक ज्ञान आणि कौशल्याने नेहमीच राजकारणात वेगळाच ठसा उमटवला.

 

तालुका राजकारणातून केलेली राजकीय सुरुवात आज दिल्ली तख्तावर स्थिरावली. त्या सर्व राजकीय कारकिर्दीत सुनिल तटकरेंनी डावपेचांची चुणूक दाखविली. त्यामुळेच तटकरेंना राजकीय उलथापालथींचे जनक बोलले गेले. राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडून येवुन दिल्लीत अटकेपार झेंडा फडकविला.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतील सुनिल तटकरेंचा निसटता पराभव उद्याची विजयी पहाट घेऊन आला होता. याची प्रचिती 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आली. मूळात तटकरेंनी 2014 च्या पराभवानंतरच 2019 ची तयारी केली होती आणि म्हणूनच आप्त स्वकीय यांसह सर्वच विरोधी वादळे शमविण्यात तटकरे कमालीचे यशस्वी ठरले. 2019 ची निवडणूक जिंकून तटकरे खासदार झाले. त्यानंतर पुन्हा अनेक राजकीय समीकरणे बदलली असताना 2024 च्या निवडणूक देखील अभूतपूर्व यश संपादन केले. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकरणात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव व प्रगल्भ अभ्यास आहे. राज्याचे अर्थमंत्री , जलसंपदा मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदी महत्वाचे खाती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. त्यांच्याकडे विकासदृष्टी आहे, विशिष्ट ध्येय व व्हिजन ठेऊन ते काम करतात, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. आपल्या विविध भुमिकेतून जनतेचे प्रश्न ते मार्गी लावतात, थोरा मोठ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ते।ताईत आहेत. उत्कृष्ट वक्तृत्व व नेतृत्व गुण असल्याने ते सहज आपल्या शत्रूंना देखील जवळ करतात, राजकारणातील ते भीष्म पितामह आहेत. विरोधकांना जेरीस आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे.प्रत्येक गोष्टीला ते कृतीतून उत्तर देतात. खासदार या नात्याने ते संसदेत• कोकणचे प्रश्न सोडविण्यासाठी ते हिरीरीने प्रयत्न करतात. त्यांचे संसदेतील मराठीतील भाषण उल्लेखनीय व प्रभावी होते.

 

सत्तेत नाहीत, ही भावनाच तटकरेंना मान्य नाही. तिच मानसिकता रोहा यांसह सबंध जनमताची झाली. त्यातून रोहा, श्रीवर्धन शहर, ग्रामीणात करोड़ो रूपये निधींची विकासकामे आणली. आरोप प्रत्यारोपाशी अगदी दिलखुलास सामना करत तटकरेंनी राजकारण उंच पातळीवर नेला.

 

आज रायगडचे नवनिर्वाचीत खा. सुनिल तटकरे यांचा वाढदिवस संसदेत दुसऱ्यांदा गेलेल्या तटकरेंच्या वाढदिवसाला आगळे महत्व आहे. राज्याच्या विविध मंत्री, उर्जामंत्री पदाचा अनुभव असलेल्या तटकरेंनी लोकसभेतही कर्तृत्व व वकृत्वाची चांगलीच झलक दाखविली. प्रश्नत्तोराच्या तासात जिल्ह्यातील अनेक मुद्दे उपस्थित केले. आणि आजही करीत आहेत. त्यामुळे तटकरे दिल्लीतूनही जिल्ह्याला पुन्हा झुकते माप देतील याची खात्री सर्वानाच झाली आहे.

 

पराभव होत होत केंद्रियमंत्री गीतेंचा याच तटकरेंनी पराभव केला आणि देशातील मोदी लाटेवर मागील निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांना स्वार होऊ दिले नाही हे अधोरेखीत झाले.

 

आव्हाने खूप आहेत, कोकण, रायगड जिल्ह्याचे पर्यटन वाढीचे प्रयत्न, नवे प्रकल्प, रिफायनरीसारख्या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका नवे खासदार यांना घ्यावी लागणार आहे. राजकारणात सबकूच तटकरेंचे पाय घट्ट रुतून बसले. त्याचे नेमके कारण तटकरे राजकीय मुत्सद्दी हेच आहे.

 

आता रायगडचे नवे खासदार जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न, नवे मुद्दे कसे तडीस नेतात ? राजकीय किंगमेकर म्हणून इतर राजकारण्यांना कसे धाकात ठेवतात ? हे दिसणार आहे.

 

वाढदिवसी नवे खासदार सुनिल तटकरे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील धृवतारा होवोत हीच शुभेच्छातून सदिच्छा !!!

 

-प्रकाशभाऊ देसाई

शब्द संकलन- धम्मशील सावंत, रायगड महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *