विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या.
संस्कृत विषयात कुमारी संदे अलिशा अकील 100 गुण, कुमारी मुल्ला अलीया रियाज 100 गुण ,कुमारी कांबळे सिद्धी केरू 100 गुण मिळाले. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींचे, मुख्याध्यापिका सौ थोरात यू . ए. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी , आणि पालकवर्ग सर्वांचे अभिनंदन श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव आदरणीय श्री जयवंत पांडुरंग पाटील तसेच खजिनदार श्री. संजय बदीयाणी आणि आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले व शुभेच्छा दिल्या.