नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या कौन्सिल च्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी शिबू राजन यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी राष्ट्रीय कमिटीने शिबू राजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्ज पुरवठ्यासाठी मदत
MSME ही लहान व्यवसायिकांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्या अंतर्गत कोणताही व्यावसायिक MSMEPCI अंतर्गत सुलभ कर्ज प्रक्रियेद्वारे त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवल मिळवू शकतो. छोट्या व्यवसायांना त्यांच्या व्यवसायाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भांडवल मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कर्जाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौन्सिल च्या तज्ज्ञांची टीम कर्जदारांना मदत करणार आहे. MSME अंतर्गत इच्छुकांना कर्ज मिळवून देणे, त्यांच्या उत्पादन आणि सेवांना बाजार पेठ उपलब्ध करून देण्याचे काम देखील कौन्सिल च्या माध्यमातून केले जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कौन्सिल च्या जिल्हास्तरीय समित्यांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गरजूंपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या MSME च्या सर्व योजना पोहचवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे कौन्सिल चे महाराष्ट्र अध्यक्ष शिबू राजन यांनी सांगितले आहे.