सातारा :-वडूज प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा शहर पत्रकार संघ तसेच अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ लालबहादूर शास्त्री विद्यालय सातारा चे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर हे होते. प्राध्यापक मधुसूदन पत्की ज्येष्ठ संपादक व समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, प्राध्यापक जयंत लंगडे संपादक लोकसम्राज्य न्यूज समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, श्री वैभव सपकाळ कार्यालयीन प्रतिनिधी तसेच श्री प्रकाश महाडिक कार्यालयीन प्रतिनिधी व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी मिलिंदा पवार यांनी केले तर प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी भारत देवकांत यांनी केले व पाहुण्यांचा परिचय प्रशिक्षणार्थी पूजा जगताप यांनी केला तसेच प्रमुख पाहुणे पाटणे सर व कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पत्रकारितेमधील अडचणी व फायदे याबाबतीत माहिती दिली. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रपाठक पतकी सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थी मनोगत ही झाले व नंतर अध्यक्ष अशोक तवर यांनी अध्यक्षीय भाषण केले व सर्वांसमोर अनुभवांचे शिदोरी खुली केली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रात्यक्षिक कार्यअंतर्गत नमुना वृत्तपत्र अंजिक्य संवाद चा प्रकाशन समारंभ करण्यात आला तसेच 2023 पत्रकारिता अभ्यासक्रम बॅचचा निरोप समारंभ व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला त्यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय हरीश पाटणे सर हे या अभासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत तसेच दैनिक पुढारीचे आवृत्तीप्रमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता तसेच माननीय विनोद कुलकर्णी सर हे देखील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी तसेच दैनिक पुण्यनगरीचे आवृत्तीप्रमुख व म सापचे शाहूपुरी शाखा अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा साहित्य मंडळाचे विश्वस्त यांची मसाप पुण्याच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .
माजी विद्यार्थी ह भ प अमोल जाधव यांनी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच माजी विद्यार्थी आग्नेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन सचिन धुमाळ यांनी केले व कार्यक्रम प्राध्यापक जयंत लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे पार पडला.