कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.
अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी
कुलदीप मोहिते कराड
शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा असून, त्या दूर करून विद्यार्थी हिताची जपणूक होणे गरजेचे आहे . सुशिक्षित बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण होणे ही शिक्षण क्षेत्रातील मोठी समस्या सध्या. बनत चालली आहे.
.. आज-काल शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढल्यामुळे अनेक पालकांना आपलं पाल्य स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालक त्याला खाजगी कोचिंग क्लासेस ला ऍडमिशन घेतात. परंतु त्याची जय्यत तयारी करून त्याला मार्क वाढवून देतो असे आश्वासन देऊन काही अकॅडमीचे मालक शिक्षक पालकांना आश्वासन देतात परंतु त्या पद्धतीचा निकाल बारावीला लागत नसल्यामुळे पालक व अकॅडमी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. दहावी अकरावी बारावी या वर्गात विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो एक्स्ट्रा मार्क मार्क मिळवून देतो असे सांगून पालकांच्याकडून ज्यादा पैसे अकॅडमी वाले घेतात परंतु बारावीत मुले गुणवंत यादीत आली नसल्यामुळे पालकांनी दिलेल्या आर्थिक व्यवहारामुळे पालक व अकॅडमी शिक्षक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.
असाच प्रकार विद्यानगर कराड येथे सुरू आहे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बोगस शिक्षण संस्थेचे जाळे येथे आहे. बोगस शिक्षण संस्था चालकांनी शासनाच्या शिक्षण विभागाकडील आशीर्वाद व डोळे झाक वृत्तीचा फायदा घेऊन स्वतःच्या अनाधिकृत शिक्षण संस्थेला अकॅडमी असे गोंडस नाव देऊन सरळ सरळ पालक शासन आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे . मुळामध्ये अनधिकृत अकॅडमी ला कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करता येत नाही त्यामुळे ॲकॅडमी चालक आणि शिक्षण संस्था चालकांनी शकल लढवून संधन मताने अर्थकारण साधण्यासाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी अकॅडमी कडे वर्ग केल्याची चित्र आहे. आपण दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे पालकांमध्ये असंतोष आहे कराड तालुक्यातील विद्यानगर येथे सुमारे 70 ते 80 खाजगी अकॅडमी आहेत पालकांकडून लाखो रुपये त्यांनी घेतले आहेत आहे परंतु बारावीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची गुण कमी झाले आहेत त्यामुळे पालकांनी स्वयंभूत शिक्षकांची धुलाई केली आहे शिक्षण क्षेत्र ज्ञानाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये खाजगी अकॅडमीच्या नावाखाली गोरख धंदा सुरू आहे असा आरोप सुरू झाला आहे अशा अकॅडमी पासून पालकांनी सावध राहून आपल्या मुलाला योग्य कॉलेजला प्रवेश घ्यावा शिक्षण विभागाने अशा बोगस अकॅडमी वर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे .नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खाजगी शिकवणीत बंदी व नियंत्रण आणण्यात आले आहे आता अकरावी बारावी दहावी अकॅडमी घेणाऱ्या खाजगी बोगस शिक्षकांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
अनाधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमीवर कारवाई होण्यासाठी शिक्षण संचालकांच्या खास पथकाने छापेमारी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं” या म्हणी सारखा प्रकार होणार आहे