27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी
मंगरूळपीर :विनोद डेरे
स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद रामकृष्ण तायडे यांची विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.निलेश कडू यांच्या मार्गदर्शनात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने चमू व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली होती. कर्नाटक नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नासिक येथे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय युवा महोत्सवाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक 12 ते 16 जानेवारी यादरम्यान सदर शिबिर घेण्यात आले असून यामध्ये विकसित भारताचे दर्शन या युवा महोत्सवा मधून घडले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये डॉ.प्रमोद तायडे यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील चमूने विविध कला प्रकारात सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विकसित भारताची संकल्पना सादर करण्यात आली.या कार्यक्रमाला मा. राज्यपाल श्री.रमेश भैस, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय खेल मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, आदि मंत्री व मान्यवरांची उपस्थिती लाभली याआदी डॉ.प्रमोद तायडे यांनी विद्यापीठाद्वारे क्रॉस कंट्री मैनगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर प्रेरणा शिबिर नागपूर आणि सहाशी शिबीर चिखलदरा या राज्यस्तरीय शिबिरामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. आणि आता राष्ट्रीय युवा महोत्सव करिता चमू व्यवस्थापक म्हणून निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब संस्थेचे सचिव डॉ. अश्विन कुमार नाईक व मानद व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी डॉ.एल.के.करागळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ.प्रमोद तायडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.