सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न
प्रतिनिधी :- मिलिंदा पवार
वडूज
औंध तालुका खटाव. येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे कुरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अश्विनी जगदाळे यांना निमंत्रित केले होते . तेव्हा त्या बोलत होत्या की
मुलगी हे परक्याचे धन ही संकल्पना बदलणे गरजेचे आहे
अध्यक्षस्थानी कुरोलीच्या सरपंच शितल देशमुख या होत्या. त्यापुढे म्हणाल्या महिलांनी अन्यायविरुद्ध लढले पाहिजे. आज जरी स्त्री बाहेर पडत असली तरी समाजकंटकांना तिला तोंड द्यावे लागते. तिची छेड काढणे, बलात्कार यासारख्या घटना अजही घडत आहेत. या घटनांना रोखण्यासाठी स्त्रीने सजग झाले पाहिजे. न घाबरता तिने कायद्याचा आधार घेतला पाहिजे. स्त्रियांसाठी खूप कायदे आहेत, पण या कायद्यांची अंमलबजावणी नीट होण्यासाठी स्त्रियांनी स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचे दिसते. स्त्रियांची स्थिती सुधारली आहे परंतु ती आणखी सुधारणे गरजेचे आहे. विशेषतः अशिक्षित महिला यांच्या बाबतीत अन्याय कारक घटना बऱ्याचदा घडताना दिसतात. इंदिरा गांधी, कल्पना चावला, प्रतिभा पाटील, सरोजिनी नायडू, पी टी उषा. वगैरे स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना शितल देशमुख म्हणाल्या की, महिलांनी आता निर्भय झाले पाहिजे. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले पाहिजेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. निकम वसुधा दत्तात्रेय हिने केले.सूत्रसंचालन कु. मांडवे सानिका सयाजी हिने कले तर कार्यक्रमाचे आभार कु. थोरवे पूजा पोपट हिने मानले.कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ.पोळ हणमंत,प्रा.मोमीन शहनाज,प्रा.सुधाकर कुमकर,प्रा.सर्जेराव भोसले,प्रा.जगन्नाथ ननवरे,प्रा.तुषार सावंत,प्रा.गजानन शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी मोहन माकार,राजू शेख ,शिबीरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी, सिद्धेश्वर कुरोलीच्या महिला उपस्थित होत्या.