सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते शुभारंभ
रायगड (धम्मशील सावंत )रायगड जिल्ह्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील ४४ गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता.
महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, तसेच येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा अशी विनंती उमटे धरण संघर्ष ग्रुप व परिसरातील स्थानिकांनी अनेक वर्षे शासना कडे वारंवार विनंती केली होती. मात्र याची मुहुर्त मेढ आज १७ मे रोजी उमटे धरण संघर्ष ग्रुप व स्थानिकांच्या एकजुटीने नारळ वाढवून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
कामाचा शुभारंभ उमटे परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते करण्यात आले,परिसरातील नागरिकांना ही नारळ वाढवण्याचा मान देण्यात आला.
शासनामार्फत धरणातील गाळ काढा अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्याची सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला (सीएफटीआय) सीएसआर फंडातून परवानगी द्यावी, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले शासकीय मान्यता मिळाली आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागातून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली.
एकजुटीने कामाला सुरुवात झाल्यामुळे स्थानिकांमध्ये उत्साह दिसून आला. परिसरातील उद्योजकांनी गाळ काढण्यासाठी, पोकलेन, जेसीबी, डंपर व इतर उपकरणे उपलब्ध करून द्यावी अशी विनंती उमटे धरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी नंदेश गावंड आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असणाऱ्या नागरिकांनीही आपली मते व्यक्त करून धरणातील गाळ काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उमटे धरणाचा गाळ काढण्यास सुरुवात होणे ही आमच्या विभागासाठी परिवर्तनाची नांदी आहे,शापित गाळमुक्त धरणासाठी एक पाऊल पुढे येऊन सहकार्य करावे,मा.चित्रलेखा पाटील व मा.प्रशांत नाईक यांचे आभार मानतो,आमच्या अभियानाला मदत करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो,,,
अँड,राकेश पाटील,उमटे धरण संघर्ष ग्रुप,
उमटे धरणाचे पाण्यावरती अवलंबुन असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आपल्या कुटुंबा समवेत एकदातरी उमटे धरणाला सदिच्छा भेट देऊन धरणाची परिस्थिती आणि जनजागृती करण्यासाठी सहकार्य करावे,