प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाचे औचित्य साधून आजी माजी सैनिक संघटनेकडून अनोखा स्तुत्य उपक्रम.
उंब्रज प्रतिनिधी कुलदीप मोहिते
अमृतमहोत्सवी ७५वा प्रजासत्ताक दिन सगळीकडे साजरा करणेत आला, पण मौजे निगडी ता. कराड येथील आजी माजी सैनिक संघटना निगडी यांचे वतीने गावातील जेष्ठ नागरिक! पण धोतर व तीन बटनी नेहरू असा पेहराव व,८५, ९०,९५,९६ या वयोगटातील नागरीकांचा यथोचित मानसन्मान करून सत्कार करण्यात आला. त्याला कारण ही तसेच होते काळाच्या ओघात धोतर, विजार, नेहरू हा पेहराव लोप पावत चालला आहे, या पेहरावात या पिढी नंतर हा पोशाख सुद्धा आपल्या ला बघायला मिळतो की नाही या बद्दल शंका आहे? म्हणून खासकरून ही आठवण रहावी याच अनुषंगाने हा आगळावेगळा उपक्रम आजी माजी सैनिक संघटनेने साजरा केला. त्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार केला, या संघटनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पासून ही संघटना स्थापन केली तेव्हापासून काही तरी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या बद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करणेत येते, स्वागत कमान, गावची यात्रा, व इतर सर्व धार्मिक कार्यासाठी लागणारा रथ असेल, जि. प. शाळेसाठी स्वागत कमान, व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असेल इत्यादी अनेक उपक्रमात सैनिक संघटनेचा सक्रिय सहभाग असतोच, तरूण वयात देशाचे संरक्षण, आणि निवृत्ती नंतर गावच्या सामाजिक कार्यात सहभाग हे खरोखर वाखाणण्याजोग आहे.अशाच पद्धतीने गावच्या इतर संघटना, गणेश मंडळे यांनी आदर्श घ्यावा व गावच्या विकासासाठी व एकीने विकास साध्य करावा, पुन्हा एकदा सैनिक संघटनेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.