सहकार चळवळ समृद्ध व सुदृढ करण्यासाठी सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांवर परखड चर्चा व्हावी या उद्देशाने मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने 2 री पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषद 2024 चे उदघाटन कराड येथील कराड अर्बन शताब्दी सभागृहात 29जानेवारी 2024 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व मळाई ग्रुपचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा मनोहर माळी,सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था कराड श्री.जे. पी.शिंदे, अर्बन कुटुंब कराड, सुभाषराव जोशी,कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचार मंच अध्यक्ष डॉ. शरद शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, समाजातील विविध घटकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याची क्षमता सहकार चळवळीमध्ये आहे. सहकार चळवळ समृद्ध व सुदृढ होऊन ती लोकाभिमुख व्हावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रा. शरद शेटे यांनी केले ते म्हणाले, देशाच्या विकासामध्ये राज्याच्या सहकार क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असून शिक्षण व सहकारी क्षेत्र परस्पर पूरक आहे असे म्हणून सहकार क्षेत्राची संपूर्ण व्याप्ती त्यांनी मांडली.
कराडचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सहकाराला उज्वल भविष्य आहे सहकारातील विद्यार्थ्यांनी सहकारी संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कारभाराची माहिती घ्यावी. सहकार खाते सहकाराला देशपातळीवर नेण्याचे काम करीत आहे. ही अभिमानाची बाब आहे तसेच सहकार राजकारण विरहित असले पाहिजे.विश्वस्ताच्या भूमिकेत काम करताना निस्वार्थपणे करून सहकारासाठी शंभर टक्के योगदान ही दिले पाहिजे. व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांचा विकास साधने हेच सहकाराचे उद्दिष्ट ते साध्य करण्याचे काम आपण सर्व सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केले पाहिजे.
यावेळी अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी अर्थतज्ञ प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शीला पाटील यांनी केले. तसेेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रा. सतीश जंगम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे समन्वयक प्रा.सतीश जंगम, मळाई ग्रुपचे समन्वयक प्रा.आर. डी. पाटील, मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा मलकापूर नगर परिषद विरोधी पक्षनेते अजित थोरात, व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे,अरुणादेवी पाटील. डॉ.स्वाती थोरात, बी. बी. पाटील,पी. जी. पाटील,वसंतराव चव्हाण,
प्रा. संजय थोरात,चार्टर्ड अकाउंटंट के. ए.सावंत मळाई देवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक ,
उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तसेच मळाईदेवी नागरिक सहकारी पतसंस्थेचे सर्व शाखांचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम केले.