पाली : बेणसे दि. (धम्मशील सावंत )
सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला आहे.
विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यां मध्ये तिन्ही मुलींनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावून मुलांन पेक्षा मुली कुठेच मागे नसल्याचे सिध्द केले आहे. कु.आर्या,कु.शर्वी,कु.प्रिशा या गुणी मुलींचे ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मिस.रेमोल वर्गीस व फादर बेजाॅय जाॅर्ज व स्कूल मधील सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. कु.आर्या सुनिल बडे हिचे वडील सुनील लक्ष्मण बडे , सॉलवे कंपनी धाटाव एम.आय.डी.सी रोहा,येथे प्रोडक्शन ऑफिसर आहेत.
तर आई सौ.करुणा बडे, डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज,गोवे कोलाड,येथे ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत.संपूर्ण कुटुंब उच्च विद्याविभूषित आहे.कु.आर्या बडे हिच मुळ गाव आंबेघर पो.पिगोंडे ता.रोहा जिल्हा.रायगड येथील आहे.कु. आर्याने दहावी बोर्डात शाळेत प्रथम क्रमांक पटकावून आंबेघर गावचे नाव रोशन केले असून आर्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.