जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……

 

मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

कुलदीप मोहिते कराड

 

. कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 कराड विद्यानगर परिसरामध्ये कोणताही शासकीय परवाना न घेता शासनाचे नियम अटी धाब्यावर बसवून ,मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक अकॅडमी सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. मोठमोठे जाहिरातीचे बोर्ड गुणवत्ता ची यादी यांचे आकर्षण दाखवून पालकांना तुमच्या विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतो त्याला मार्क वाढवून देतो असे सांगून त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन त्यांना लुबडण्याचा प्रकार विद्यानगर परिसरात सुरू होता. याबाबत पालकांकडून तक्रारी आल्यानंतर ,प्रसार माध्यमांनी याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर विद्यानगर परिसरातील अकॅडमी प्रकरणी शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी ॲक्शन मोड आले आहेत. 22 संघटनांनी निवेदन देऊन कारवाई करण्याचे सांगितले आहे या प्रकरणाची कराड व परिसरात चांगली चर्चा सुरू आहे कालच मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले आहे शिक्षण विभागाने सुद्धा परिपत्रक काढून अकरावी बारावी कॉलेज यांना 80 टक्के विद्यार्थी हजरी असणे आवश्यक्य आहे संबंधित महाविद्यालय जर खाजगी कोचिंग क्लासेस रेफरन्स करीत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे विद्यानगर परिसरातील अनाधिकृत अकॅडमी चे फलक हटवले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे . भविष्यात काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यात सुद्धा असा प्रकार घडत असल्याचा शिक्षण अभ्यासक सांगत आहेत.

 

ही कारवाई शासनाचे नियम व अटी न राबवता विनापरवाना चालू असलेल्या तसेच आर्थिक लूट करणाऱ्या अकॅडमी विरुद्ध चालू आहे ,तर काही अकॅडमी शासनाच्या नियमांचे पालन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *