वडूज :- मिलिंदा पवार
सिध्देश्वर कुरोली येथे परमहंस यशवंतबाबा महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रथोत्सव व महारिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी अविनाश देशमुख यांच्या हस्ते रथपूजन झाले. यावेळी यशवंतबाबा आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, उद्योजक जनार्दन मोरे, विष्णूशेठ बागल, धनंजय क्षीरसागर, विश्वस्त राजूकाका देशमुख, कुमार शेटे, माजी सरपंच राजू फडतरे, निवृत्त कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख, पै. रणजित देशमुख, प्रकाश माळी, अमरसिंह देशमुख, विक्रम देशमुख, काकासाहेब महामुनी-सुतार, प्रदीप शेटे, राजेंद्र चव्हाण, विजय शेटे, शरद जाधव,अनिरुद्ध लावंगरे, सिदू गोडसे, सुदाम महामुनी, तुकाराम वलेकर, रवींद्र माळी, संतोष माळी यांची उपस्थिती होती.
रथपूजनानंतर महाआरती होऊन बाबांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथासमोर सिध्देश्वर हायस्कूलचे लेझीम, झांजपथक तसेच जायगांव येथील स्वरकला ब्रॉस बॅन्डचे वादन हे खास आकर्षण होते.
सिध्देश्वर मंदिर, कुंभार गल्ली, पाटोळे गल्ली, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय, वडार गल्ली, साई मंदिर मार्गे सायंकाळी उशिरा रथयात्रा मंदिर परिसरात आली. जागोजागी सडा, रांगोळी टाकून रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले होते ठिकठिकाणी लोकांनी दर्शन घेऊन पालखीची पूजा केली.
पालखी व अश्वपूजन…
पुण्यस्मरण सोहळ्यानिमित महारिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. रिंगण सोहळ्याच्या मानाच्या रहिमतपूरकरांच्या अश्वाचे पूजन आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत व चालुवर्षीचे मानकरी श्री. व सौ. डाळे यांचे हस्ते पालखी व अश्व पूजन करुन रिंगणास प्रारंभ आला
रथावर देणगी अर्पण केली.
काँग्रेसचे प्रदेश सचिव रणजीतसिंह भैय्यासाहेब यांचे हस्ते आरती झाली रिंगण सोहळ्याला प्रमाकर देशमुख व सहकाऱ्यांनी भेट दिली. रिंगण सोहळ्यास जवळपास ३५ गावच्या दिंड्यानी सहमाग नोंदविला. दोन दिवस महाप्रसादाचे आयोजन केले होते.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लोकांची बसण्याची व्यवस्था आर एस पी च्या विद्यार्थी आणि विदयार्थांनी केली होती तसेच प्रसादाचीही अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली होती.
रात्री ८ ते १० कुमठे, तासगाव येथील एकतारी भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर १० ते ११.४५ पर्यंत ह.भ.प. गजानन बुवा कुमार यांचे फुलांचे कीर्तन झाले.