Vijay Wadettiwar I अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

 

मुंबई, दि.११:- आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे कामकाज किती होईल माहीत नाही. अधिवेशन कालावधीत कामकाज होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांवर विसृत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा अशी ,आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी कामकाज बंद पाडले. त्यामुळे बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्याही विधान परिषद निवडणुकीसाठी विधीमंडळात मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे अपेक्षित कामकाज होणार नाही. अजून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही.

बीलावर चर्चा करणे आवश्यक आहे. लक्षवेधीला महत्व दिले जाते. त्याचप्रमाणे प्रस्तावावर देखील अधिक चर्चा होणे महत्वाचे आहे. तरच जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल. त्यामुळे अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *