Umte Dam I उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या अतिधोकादायक भिंतीच्या कामाला सुरुवात

उमटे धरण संघर्ष समिती रायगडच्या प्रयत्नांना यश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती. उमटे धरण संघर्ष समितीच्या अँड राकेश पाटील यांनी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या,त्या बाबतीतल्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी सुद्धा धरणाच्या पडलेल्या भगदाडीच्या बाबतीत अहवाल सादर केला होता,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये टीका होऊ लागल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री,बाष्टेवाड,तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेंगुर्लेकर व अधिकारी उमटे धरणावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी करून दोन दिवसापूर्वी उमटे धरणाच्या भागदाडीचे कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमटे धरणाच्या धोकादायक ओव्हरफ्लो भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.(छाया:धम्माशील सावंत,पाली बेणसे)
उमटे धरणाच्या धोकादायक ओव्हरफ्लो भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.(छाया:धम्माशील सावंत,पाली बेणसे)

पावसाळ्यात हे काम होत असून उन्हाळ्यात हे काम केले असते तर अधिक जलद व टिकाऊ काम करता आले असते, मात्र उशिरा का होईना प्रशासनाने हे काम सुरू केले याबद्दल प्रशासनाला नागरिक धन्यवाद देत आहेत.

 

उमटे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडीचे कामाला जिल्हापरिषदेच्या माध्यमातून सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेचे आभार,धरणाच्या बांधावर असलेली मोठी झाडी तोडून एक प्रकारे उमटे धरण कित्येक वर्षानी मोकळा श्वास घेत आहे,परंतु आपत्ती यावी आणि मग मदत करावी हे चुकीचे धोरण आहे आहे,

अँड,राकेश पाटील 

उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *