उंब्रज:प्रतिनिधी श्रीकांत जाधव
उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाने गुरुवार दि.११/०७/२०२४ रोजी उंब्रज गावातील पाटण तिकाटने तसेच उंब्रज बाजारपेठ या गर्दीच्या ठिकाणीं बेशिस्त वाहन चालक यांचेवर कारवाई करून १० हजार रूपये दंड वसूल केला. यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे
सपोनि रविंद्र भोरे,पो.हवा जाधव, शिपाई हेमंत पाटील, श्रीधर माने,मयूर थोरात, निलेश पवार,राजू कोळी, महिला पोलिस अंजुम शेख,सुनिता पवार व होमगार्ड जंगम,घाडगे,अमोल निकम यांनी हि कारवाई केली. सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र भोरे यांनी केलेले आहे.