Toll Naka I स्थानिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संजय भोसले 

 

कुलदीप मोहिते तासवडे (कराड)

 

तासवडे टोलनाक्यावर 10 कि.मी.अंतरातील स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करण्यात येत असल्यामुळे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांचे नेतृत्वाखाली टोल नाका प्रशासनाधिकारी सचिन देवकर यांना निवेदन देण्यात आले आहे

 

निवेदनामध्ये नमूद केले आहे की.. स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे व पास कोणीही काढणार नाही असे सांगण्यात आले अन्यथा जर पास काढावयाची असतील तर स्वतः कंपनीने त्याचे पैसे भरावेत” कारण टोल नाका चालू झाले पासून आज पर्यंत स्थानिक वाहनधारकांनी कधीही टोल दिला नाही. किंवा पैसे देऊन पास काढला नाही.

टोल नाक्या शेजारी अनेक गावे असल्यामुळे स्थानिकांना ये जा करावी लागत असते; त्यामुळे दहा किमी अंतरातील वाहनधारकांना टोल नाका हा मोफत झाला पाहिजे किंवा त्यांचे पासचे पैसे स्वतः कंपनीने भरावेत व स्थानिकांना टोल मधून माफी घ्यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने स्थानिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल त्याची सर्व जबाबदारी टोलनाका प्रशासनाची .राहील.असे संजय भोसले व स्थानिकांनी टोल प्रशासनाच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्याप्रसंगी उपस्थित रोहन मोहिते, बाबूसिंग चव्हाण, राजकुमार घाडगे, शंकरराव घार्गे,लक्षुमण गोंजारे, दिलिप थोरात, भोसले, सौरभ शिंदे, रोहित माने व शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *