Swami Foundation I स्वामी फाऊंडेशन चे अध्यक्ष महेश परशुराम कदम यांच्यामार्फत वडिलांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त चंदरगाव शाळेला ३ ग्रीन बोर्डची भेट

 

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)

माजी सैनिक स्वर्गीय परशुराम गणपत कदम यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त सुधागड तालुक्यातील चंदरगाव शाळेला 3 ग्रीन बोर्ड (शैक्षणिक फळे)भेट देण्यात आले.

वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी जपत महेश परशुराम कदम, संस्थापक अध्यक्ष: स्वामी फाऊंडेशन ,
भारतीय मराठा महासंघ -: महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
तसेच भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे शहर ( जिल्हा)
यांच्याकडून मनसे उपाध्यक्ष सुधागड तालुका केवल ग. चव्हाण यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय चंदरगाव शाळेला ३ बोर्ड ( फळे) सप्रेम भेट देण्यात आले.


यावेळी शिक्षक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या कडुन महेश कदम यांचे आभार मानण्यात आले. कुणाचाही वाढदिवस असो अथवा पुण्यतिथी या निमित्त विविध सामाजिक ,विधायक, शैक्षणिक उपक्रम राबवून साजरे केल्यास आपल्या हातून समाजसेवा घडली जाईलच, मात्र समाजात एक आदर्शवत प्रेरक संदेश देखील जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


यावेळी केवल मनसे उपाध्यक्ष सुधागड तालुका तथा माजी विद्यार्थी
केवल चव्हाण, चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष ( माजी विद्यार्थी) परेश वनगळे ,तसेच माध्यमिक विद्यालय चंदगाव शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग शिपाई तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *