: मुंबई विभागात रायगड जिल्ह्याची बाजी
: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
: मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
रायगड :धम्मशील सावंत
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.८७ टक्के इतके आहे. तसेच मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. मुंबई विभागात एकूण ९५.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल सोमवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ९५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
…………………
५४.३५ टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील ५४७ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील ५३९ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. त्यापैकी २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३५ टक्के इतके आहे.
…………………