Shivrajayabhishek Din I किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक दिनी शिवप्रेमींची अलोट गर्दी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती

 

रायगड – दि :धम्मशील सावंत

 

दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१वा शिवराज्याभिषेक दिन सोहळातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला.

सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल -ताशे , शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते.

Shivrajayabhishek din
Shivrajayabhishek din

रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचं होते.

Shivrajayabhishek din
Shivrajayabhishek din

या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे

सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *