केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन उभारणार: जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा

 

आता लढाई आरपारची, रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रिपाइं आक्रमक , नरेंद्र गायकवाड यांचा तीव्र जन आंदोलनाचा इशारा

रिपाइं रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा उपोषणर्ते योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा

 

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी च्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतह नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगर लगतज सुरू असलेल्या कामकाजा विरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आपली शेतजमीन वाचविण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवारी
दि.(11) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथे होत असलेल्या या आंदोलनाला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त ,समाज बांधव, आणि सामाजिक व राजकीय नेते मंडळी, तसेच ग्रामस्थांचा दिवसेंदिवस मोठा मिळत आहे.

शुक्रवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी गायकवाड यांनी शेतकरी व स्थानिक जनतेचे , प्रश्न समस्या जाणून घेतल्या. रिलायन्स करीत असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांना आपली भूमिका मांडताना रिपाइं पक्ष आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना दिला.

यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून येथील तक्रारींचा पाढा वाचला. व आंदोलन तीव्र करणार असल्या बाबतची माहिती दिली. तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पेण तहसीलदार गुंजाळ यांना संपर्क करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन स्थरावर सकारात्मक भूमिका घेण्याबाबत आवाहन केले. नरेंद्र गायकवाड यावेळी म्हणाले की रिलायन्सने नव्याने प्रकल्प उभारत असताना यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेतली नाही, स्थानिक जनतेला विश्वासात घेतले गेले नाही.प्रकल्प कोणता? त्याचे फायदे तोटे काय याची माहिती स्थानिकांना दिली नाही. त्याही पुढे जाऊन येथील शेतकऱ्यांचे पूर्वापार वहीवटीचे रस्ते अडविले गेले आहेत.

गुरचरण क्षेत्र7 अडविले आहेत. गावकऱ्यांचे वहिवाट तसेच पूर्वापार रहदारीचे रस्ते अडविण्यात आले आहेत. बौद्धवाडी च्या स्मशानभूमीचे प्रश्न प्रलंबित आहेत. पाण्याच्या टाकीचा प्रश्न प्रलंबित आहे, पार्किंगचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच गावात आग लागली किंवा आपत्ती ओढवली तर रुग्णवाहिका व अग्निशमन बंब येतील जातील असा रस्ता किंवा इतर व्यवस्था केली गेली नाही. शेतकरी उपोषणास बसले आहेत कारण या शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीने कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतल्या आहेत. येथील जमिनी एम आय डी सीने आयपीएल साठी घेतल्या होत्या, त्यानंतर आयपीएल कडून रिलायन्स कडे हस्तांतरण झाले. येथील जमिनी केवळ ताब्यात घेतल्या मात्र या जमिनी कित्येक वर्षे पडीक होत्या.

इथं कोणताही प्रकल्प आला नाही. येथील सुशिक्षित बरोजगार तरुण, स्थानिक नोकरीसाठी शहरी भागात इतरत्र जात आहेत. ही शोकांतिका आहे. ग्रामस्थांनी7 आपल्या समस्या व तक्रारी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडे मांडल्या आहेत. मात्र याची कोणतीही दखल प्रशासन घेत नाही. या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे. मात्र रायगड जिल्ह्यांत पेण तालुक्यात कायद्याची पायमल्ली होते आहे. रिलायन्स ला प्रशासन पाठीशी घालत आहे. तीन दिवस शेतकरी योगेश अडसुळे आमरण उपोषणास बसले असून त्यांच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथे उभारले जाणारे आंदोलन व त्या लढ्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे याठिकाणी येऊन स्वतः करणार आहेत.

अशातच आंदोलकांना6 भीती दाखवून कोणतीही दडपशाही केल्यास आम्ही ती खपवून घेणार नाही. स्थानिकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र होईल, आम्ही अन्याय सहन करणारे नाहीत , संपूर्ण रायगड जिल्हा व राज्याचे रिपाइं कार्यकर्ते येथे येतील व मोठं जन आंदोलन आम्ही उभारू असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला.

यावेळी रिपाइं जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश संघटक रवींद्रनाथ ओव्हाळ, रायगड जिल्हा युवक सचिव ऍड सुशील गायकवाड,रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत कांबळे, सुधागड तालुका युवक अध्यक्ष निशांत पवार,रायगड जिल्हा युवक संघटक अक्षय गायकवाड,ऍड प्रकाश कांबळे, पाली युवक शहर अध्यक्ष दिनेश गायकवाड , जगदीश वाघमारे, सुदीनं शिर्के आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *