म्हसळा – सुशील यादव
न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती.
सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि समाज सेवक अजय करंबे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी श्रीवर्धन बस आगार प्रमुख महिबूब मनेर यांची भेट घेऊन विनंती वजा सकारात्मक चर्चा केली असता लागलीच आगार प्रमुख श्रीम.मनेर यांनी बस फेऱ्यांचे वेळेत बदल करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली.
नवीन वेळे नुसार सकाळी ११.१५ वा.सुटणारी बस आता सकाळी १० वाजता सुटेल अशी माहिती देताना बस सेवेच्या कार्यवाही प्रसंगी नगरसेविका तथा तालुका शिवसेना महिला अध्यक्षा राखी करंबे,शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट अजय करंबे,उपतालुका प्रमुख प्रविण बनकर,स्वप्नील चांदोरकर,पवन भोई,दीपेश जाधव,दिनेश नाक्ती,विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.या वेळी आगार प्रमुख श्रीम.मनेर यांचे नगरसेविका राखी करंबे यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.