पाली/बेणसे दि. (धम्मशील सावंत)
रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेने आपटवणे शाळेतील आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी बांधव , शेतकरी, कष्टकरी, मजूर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
येथील गरीब गरजू मुलांना शिक्षण घेण्यात कोणत्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी विविध संस्था मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवितात. अशीच शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेने जोपासली आहे.
सुधागड तालुक्यातील शाळा आपटवणे येथे या कार्यकम प्रसंगी रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बापूसाहेब नेणे व सदस्य श्री युवराज महाजन माजी प्राध्यापक पालीवाला कॉलेज तसेच सदस्या श्रीमती सागळे या शाळेत उपस्थित होत्या.
रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेने या आपटवणे शाळेतील आदिवासी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रमिला म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक वृंद गणेश म्हात्रे, सीमा वैद्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.