Panvel I पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे शालेय साहित्य वाटप व मालडुंगे येथे वृक्षारोपण

रायगड- धम्मशील सावंत

तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम गेले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतात.

शुक्रवारी राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच मालडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांचे लागवड करण्यात आली.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायदंडे सहसचिव राम बोरिले मालडुंगे ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सुरेश मोहिते शाळेचे शिक्षक चौधरी सर पत्रकार सनीप कलोते, रवींद्र गायकवाड,सुनील वारगडा ,दिपाली पारस्कर राजेंद्र कांबळे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी उपस्थित होते.

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा असे विविध उपक्रम राबविले जातात पत्रकारांकरिता आरोग्य शिबिर विमा पॉलिसी चे वाटप गोरगरीब आदिवासी भागात नेत्रचिकित्सा मोतीबिंदू ऑपरेशन असे विविध उपक्रम पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून .आणि समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने राबविले जात असल्याचे यावेळी निलेश सोनावणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *