विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर
( सभापती गोवा)
गोवा लोकशासन विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले, दिल्ली येथे मोठ्या दिमाकात शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला यावेळी गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, गोव्याच्या सभापती रमेश तवरकर यांच्याशी लोकशासन प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की गोव्यासारख्या राज्याला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळतंय याचा आम्हाला अभिमान आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींना देशाच्.या जनतेने संधी दिली त्याचबरोबर उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना संधी दिली त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटनांनी काम केले त्याचबरोबर जनतेने साथ दिली. दक्षिण गोव्यातून उमेदवार पल्लवी ताईंचा निसटता पराभव झाला याचे दुःख झाले परंतु निवडणुकीत हार जीत होते. जबाबदारी घेऊन जनतेची सेवा करून जनतेचा विश्वास सार्थ करून पुन्हा पुढील काळात त गोव्यात नरेंद्र मोदी विचाराच्या विजय करू असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रमेश तवरकर यांनी व्यक्त केला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे यावेळी त्यांनी सांगितले.