Maharashtra Foundation I महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग

 

स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ

 

रायगड- धम्मशील सावंत

 

ज्ञानदीप सार्वजनिक वाचणालय सत्कोंडी येथे नुकतेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

यावेळी जे.एस.डब्यु एनर्जीचे श्री अनिल दधिच म्हणाले, सत्कोंडी गाव हे एक एकसंघ गाव आहे. येथील प्रत्येक उपक्रम हा कौतुकास्पद असतो,सर्वांना बरोबर घेऊन असतो.त्यामुळे भविष्यात या गावच्या विकासासाठी आपण त्यांच्या सोबत राहणार आहोत. तसेच उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता शिरभाते म्हणाल्या.

शिक्षणामुळे प्रगतीची दारे उघडू शकतात.सत्कोंडी गावातील शैक्षणिक वातावरण पाहता यापुढे सर्वतोपरी सहकार्य राहील असे स्पष्ट केले.यावेळी श्री विलास कोळेकर ,श्री संतोष रावणंग,सरपंच सतिश थुळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

Maharashtra foundation
Maharashtra foundation

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय बैकर यांनी केले.तर सुत्रसंचालन अरुण मोर्ये यांनी केले. आभार श्री नितीन जाधव यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

श्री. संतोष रावणंग-अध्यक्ष कुणबी कर्मचारी सेवा संघ , श्री राजकुमार जाधव,अरफाना सय्यद ,राजेश जाधव सर ,भाऊ काताळे ,चंद्रकांत मालप. उपसरपंच,अजय काताळे, ग्रामपंचायत सदस्य ,समीक्षा घाटे , सदस्य ,निकिता शिगवण , सदस्य ,ममता बंडबे , सदस्य ,प्रणाली मालप आदी मान्यवर व नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *