सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश कोरेगाव येथे प्रभु विश्वकर्मा भवन होणार
कोरेगाव लोहार समाज बांधवांच स्वप्न साकार होणार
सातारा मिलिंद लोहार-कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज
सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश प्राप्त झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने कोरेगाव-खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार ना. महेशजी शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी कोरेगाव येथे प्रभु विश्वकर्मा भवन व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी आमदार साहेबांनी प्रभु विश्वकर्मा भवनासाठी जागा देवू व इमारत बांधुन देवू अये आश्वासान दिले होते. तेव्हापासुन सकल लोहार समाज विकास मंच कोरेगाव कार्यकारिणीचे अध्यक्ष नवनाथ पवार, कार्यकारिणीचे सदस्य (व जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष) सतत या मागणीचा पाठपुरवठा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मा.ना.महेशजी शिंदे व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांनी भवनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. व आमदार महेश शिंदे यांनी भवन बांधणेसाठी निधी मंजुर केलेला आहे. त्याचा पहिला हप्ता २०लाख रूपये मंजुर झालेला आहे.रविवार दिनांक २८/९/२०२४ रोजी त्यानिमित्त कोरेगाव कार्यकारिणीच्या वतीने मा.ना.श्री. महेशजी शिंदे नगरपरिषदेचे आजी माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, यांचा सत्कार करणेसाठी दरबार हॉटेल, कोरेगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार साहेबांनी प्रभु विश्वकर्मा भवन दोन टप्प्यात दोन मजली बांधून देवू असे आश्वासन दिले.या प्रसंगी सकल लोहार समाज विकास मंच सातारा यांचे वतीने लोहार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे अशा आशयाचे निवेदन मा. ना. महेशजी शिंदे यांना देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मा. ना. महेशजी शिंदे, कोरेगाव नगरपरिषदेचे आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष उपस्थित होते. तसेच कोरेगाव कार्यकारिणीचे सर्व सदस्य, लोहार समाज विकास मंच सातारा संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण सर, उपाध्यक्ष सुरेश माने, सचिव सुरेश चव्हाण, सदस्य भगवान हरिहर, सदस्या सौ. मंगलताई पवार उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश माने यांनी केले. तसेच कोरेगाव कार्यकारिणीचे अध्यक्ष पत्रकार नवनाथ पवार यांनी सर्वाचे स्वागत केले. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नवनाथ पवार यांनी सर्वांना जेवण दिले.फोटो ओळ -लोहार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे अशा आशयाचे निवेदन मा. ना. महेशजी शिंदे यांना देण्यात आले. (छाया मिलिंद लोहार)