कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल
कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश,
प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल.
कुलदीप मोहिते कराड
कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती.
वडोली निळेश्वर, व शासकीय वस्तीग्रह विद्यार्थी, विद्यार्थिनी पार्ले ग्रामस्थ, वडोली ग्रामस्थांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा वापर करावा लागत होता, बस सेवा अनेक दिवस बंद होती. कधीकधी बस येत नसल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींना पायपीट करावी लागत होती.
अडचणीचा रस्ता असल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यतानाकारता येत नव्हती त्यामुळे बस सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ विद्यार्थीनी करीत होते युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन निवेदन दिले होते . लोकशासन न्यूज नेही या संदर्भातील बातमी प्रसारित केली होती. अखेर बस सेवा सुरू झाली बस सेवेचा लपंडाव न करता सातत्याने ती चालू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थ विद्यार्थी करीत आहेत.
या निवेदनात कराड उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात ,सातारा जिल्हा अध्यक्ष अमित जाधव ,निलेश पवार, विजय पवार ,अशोक मंडले दत्ता काशीद ,उमेश मोहिते ,शहानुर देसाई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला कराड अगर प्रमुख यांनी निवेदन दखल घेऊन बस सेवा सुरू केलीआहे.