औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम
प्रसाद दादा भोईर यांच्या उपस्थितीत असंख्य वृक्षांची लागवड
वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा केला संकल्प
रायगड (धम्मशील सावंत )पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना – औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम दि. (05) शुक्रवारी पार पडला. भाजपा पेण सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रसाददादा भोईर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेच्या प्राचार्य विद्या पाटील, गटनिदेशक सिद्धार्थ भगत,तसेच विद्यार्थी,शिक्षक वर्ग, यांच्या उपस्थितीत भर पावसात वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रसाद दादा भोईर म्हणाले की, झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण म्हणजे विकास असं मानलं जातं.
मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक, ठरतो. या दोन्ही मध्ये समतोल राखून विकास साधने गरजेचे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी उभारलेली ही वृक्षलागवड चळवळ पर्यावरण हित जोपासणारी असल्याचे प्रसाददादा भोईर यांनी सांगितले.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यावर उपाययोजना या अनुषंगाने वृक्षारोपण उपक्रम अंत्यन्त उपयुक्त ठरतोय. ग्लोबल वार्मिंग, हवामान बदल, बदलते ऋतुचक्र यांसारख्या समस्याने संपूर्ण सजीववृष्टी, वसुंधरा ग्रासली आहे. जैवविवीधतेचा ऱ्हास देखील होत आहे. यावर वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन हा अंत्यन्त प्रभावी उपाय आपल्याकडे आहे. लागवड केलेले प्रत्येक झाड जगविणे ही आपली कर्तव्य जबाबदारी आहे असे भोईर म्हणाले.
प्राचार्य विद्या पाटील यांनी म्हटले की औद्योगिकीकरणासोबत होणारे प्रदूषण याचा करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. या वर्षीचा उन्हाला प्रचंड तीव्र होता, आपली पृथ्वी हळूहळू गरम होत चालली आहे हे सर्व गोष्टींपासून सुरक्षित राहायचं असेल किंवा पृथ्वी वाचवायचे असेल तर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आपल्याकडे आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे चा परिसर भविष्यात हिरवळीने दाटलेला दिसेल. असा विश्वास प्राचार्य विद्या पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करण्याचा निर्धार करून वृक्षलागवड केलेले प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दादा भोईर, विद्या राजेंद्र पाटील प्राचार्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे, गट निदेशक सिद्धार्थ भगत, दिलीप बडे, विद्या बावकर, आदिसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.