श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट ,कराडच्या विठामाता विद्यालय कराडमध्ये बुधवार, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर देसाई व्ही . आर.यांनी हवेतील कार्बन वायु विषयी विशेष माहिती सांगितली.
पर्यावरणातील प्रदूषण कारक घटकांविषयी त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले .विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ सानप व्ही एम यांनी यावर्षीचे पर्यावरणा विषयक जागतिक उद्दिष्ट सांगितले.
विद्यार्थी मनोगतामध्ये कुमारी उत्कर्षा पाटील, कुमारी प्रणिता नलवडे या विद्यार्थिनींनी आपले पर्यावरण विषयक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास माननीय मुख्याध्यापिका सौ थोरात यु ए यांनी पर्यावरणाचे संतुलन कसे राखावे याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही कऱण्यात आले.सौ पाटील पी एस यांनी आभार प्रदर्शन केले. कुमारी सिमरन संदे या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे नियोजन सौ पाटील पी एस यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.