कुलदीप मोहिते सातारा
भाजपा आय टी सेलच्या माध्यमातून योग दिन उत्साहात संपन्न ,सातारा जिल्हा आय टी सेल अध्यक्ष संजय घार्गे यांचे नेटके नियोजन.
योग व ध्यानधारणा हि भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून,संपूर्ण जगात दि.21 जून या सर्वात मोठ्या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो.
याच दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आय टी सेल विभाग अध्यक्ष संजय घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शाळां मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
या मध्ये जयराम स्वामी विद्यालय, वडगाव येथे जयवंत घार्गे सर,संजय घार्गे सर,दादासाहेब कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 250, हनुमानमंदिर,विंग ,कराड दक्षिण येथे सदाशिव महादेव बडेकर यांचे करवी 50,समाज मंदिर, चोरे, ता.कराड येथे मुकुंद गोळे यांनी 100, जि. प.शाळा, दा नवली , पो.भिलार, ता.महाबळेश्वर येथे संतोष आनंदा धनावडे यांनी 60, न्यू इंग्लिश स्कूल, इंदोली, ता.कराड येथे योगीराज सरकाळे व घाडगे सर् यांनी 600, म.गांधी विद्यालय, इंदोली, ता.कराड येथे चंद्रकांत जगन्नाथ सरकाळे व जाधव सर् यांनी यांनी 800,सुरभी चौक उंब्रज , ता.कराड येथे तुकाराम नामदेव तुपे यांनी 50, यशश्री अकॅडमी,कदम मळा येथे श्रीकांत कृष्णा जाधव यांनी 50,माने कॉलनी,कोडोली ,सातारा येथे मिलिंद लोहार यांनी 50, नांद गिरी , ता.कोरेगाव येथे अमोल आनंदराव भुजबळ यांनी 20,हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज , वडूज येथे अजय वसंतराव शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली 1600,मारुती मंदिर, कोकळी, ता.फलटण येथे सुधीर शाम सुंदर जगदाळे यांनी 10,राजेंद्र विद्यालय, खंडाळा येथे तुषार संभाजी भोसले यांनी 150,ग्राम पंचायत मैदान ,शिंगण वाडी येथे अजय लक्ष्मण
सूर्यवंशी यांनी 250 इतक्या संख्येत उपस्थित व्यक्तींना योग शास्त्राचे धडे जाणकार योग शिक्षक तसेच मार्गदर्शक यांच्या सहाय्याने सर्व नागरिक,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,पालक ,विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना देण्यात आले.
यावेळी योगा बरोबर ध्यान धारणा तसेच मानवी जीवनातील यांचे महत्त्व उपस्थित जाणकार व्यक्तिंकरवी विषद करण्यात आले.सदर कार्यक्रम आयोजित करून,यशस्वी करण्यासाठी भाजपा, आय टी सेल ,सातारा जिल्हा अध्यक्ष मा.संजय घार्गे,रविंद्र वाकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.