रायगड (धम्मशील सावंत) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई )यांच्यामार्फत आयोजीत केलेल्या 12 वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत तन्वी मंगेश म्हसके, मुक्काम वावे तालुका सुधागड, स्कुल जिंदल माउंट लिटेरा झी स्कुल, सुकेळी नागोठणे हिने 12 वी सायन्स सी बी एस ई बोर्ड परीक्षेत 90. 40 टक्के गुण मिळवून स्कुल मध्ये त्रितीय क्रमांक पटकाविला आहे.
या यशात मोलाचे आणि परिक्षाभिमुख मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मिस लिली रॉय , शिक्षक गौरी शंकर प्रसाद, ओंकार खोंडे, पूजा ईसाई, व्यंकटेश ममद्याल, सुविज्ञा म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लहानपणापासून अभ्यासाची व वाचनाची आवड, अभ्यासात सातत्य, जिद्ध व चिकाटी यामुळे इयत्ता 10 वी मध्ये देखील 92.02 टक्के गुण मिळवून तन्वीने यश संपादन केले होते, तसेच इयत्ता 12 वि मध्ये देखील नियमित अभ्यास करून कोणतेही क्लासेस ची जोड नसताना हे अव्वल यश मिळवले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तन्वी म्हसके हिने पुढे सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा मानस व्यक्त केला आहे.
तन्वीच्या यशाबद्दल कुटुंबीय आजोबा यशवंत गणपत म्हसके, आजी लता यशवंत म्हसके, वडील मंगेश म्हसके, रिया मंगेश म्हसके, दत्ता शिवा कांगने, विजया दत्ता कांगने, रमेश खाडे, अरुणा रमेश खाडे, प्रभाकर तेलंगे, वासंती प्रभाकर तेलंगे, लोकेश अनंत पाटेकर, स्नेहल लोकेश पाटेकर ,अनंत बालाजी पाटेकर, अनिता अनंत पाटेकर, वैभव जवके, युवा नेते उदय जवके, माजी सरपंच प्रज्ञा जवके, शारदा बारी, शैलजा देशमुख, इंदूबाई बारी, प्रिया बारी यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि अभिनंदन केले.