कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज
शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला व ते काम गेले एक ते दीड महिना झाले चालू आहे, तरी ते काम संबंधित ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे व हलक्या प्रतीची करत आहे रस्त्याला वापरलेली खडी व साईट पट्टी भरण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम हा माती मिश्रित आहे तसेच रस्त्याचे पिचिंग व्यवस्थित केलेले नाही नियमित पाणी मारले जात नाही त्यामुळे तो रस्ता आत्ताच उकरून परत करावा लागत आहे तसेच साईट पट्ट्या ही ढासळत आहेत. त्याचबरोबर मोरी( साकव) पूल चे काम ही ठिसूळ पद्धतीचे आहे त्याबाबत अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही अधिकारी व ठेकेदार लक्ष देत नाहीत कामावरील साईट इन्चार्ज उडवा उडवी चे उत्तरे देत असतात तरी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ठेकेदार व प्रशासनाचे राहील असा इशारा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे संजय भोसले, ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे .याप्रसंगी उपस्थित भवानवाडी गावचे संतोष पवार, शंकरराव गाडगे, लक्ष्मण गोंजारे, कोंडीबा गुजले ,सौरभ शिंदे , दुर्गेश भोसले ,इतर शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.