भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून काढण्यात आली
हवालदार दीपक कदम यांचे वडील भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना ऑपरेशन जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले त्यानंतर त्यांच्या आई शहीद वीर पत्नी यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना भारत मातेच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य दलामध्ये भरती केले.व त्यांचा एक मुलगा हवालदार दीपक कदम हा सेवानिवृत्त झाला आहे दुसरा मुलगा आजही भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत आहे.
या प्रसंगी प्रशांत कदम जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन यांनी मनोगत व्यक्त केले सैनिक हा कधी रिटायर होत नाही सैन्य दलातून सेवानिवृत झाले असले तरी आपले इथुन पुढचे उर्वरीत आयुष्य समाजामध्ये सोशीत, वंचित, सैनिक, शेतकरी,यांना अपल्या सैन्य सेवेतील अनुभवातून मदत करावी व युवा पिढीला प्रेरणादायी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी मार्गदर्शन करावे. आणि सैनिक फेडरेशन बरोबर संघटित रहावे.असे मार्गदर्शन केले
या प्रसंगी .शंकर माळवदे (नि.) नव सेना मेडल व माजी उपनगराध्यक्ष सातारा, कराड तालुका अध्यक्ष सदाशिव नागणे, सातारा जिल्हा महिला ब्रिगेड अध्यक्ष सौ विद्या बर्गे, सैनिक वीर पत्नी दिपाली भोसले,माजी सैनिक किरण राजे महाडिक,संतोष यादव व रमेश जाधव व सातारा सैनिक कल्याण कार्यालय अधिकारी,सर्व सातारा परिसरातील माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, सैनिक पत्नी , शहीद जवान वीर पत्नी,वीर माता, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.