कुलदीप मोहिते सडावाघापूर पाटण
सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी बहुसंख्य प्रमाणात पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात.
दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लड बाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा भरणाआहे.रस्त्यावर नाचणे पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, गाडीतील टेप रेकॉर्डरलावून धिंगाणा घालणे या प्रकारची हुल्लडबाजी सडा वाघापूरला मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत .आहे. याच पार्श्वभूमीवर पाटण पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत पोलिसांच्या वतीने हुल्लड बाजारांवर करडी नजर राहणार असून पाटण पोलिसांच्या वतीने सडा वाघापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आलाआहे. अशी माहिती मल्हार पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वेतन मछले यांनी दिली आहे आपल्या हुल्लडबाजीने पर्यटन स्थळाला गालबोट लावू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.आहे.
दरम्यान रविवारी मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वेतन मचले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन पोटे , उपनिरीक्षक रामराव वेताळ पोलीस हवलदार मोरे संदीप घोरपडे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे गृहरक्षक निकम यादव यांनी मल्हार पेठ पोलीस ठाणे(पाटण) अंकित चाफळ दूर शेत्र हद्दीत मौजे डेरवण येथे नाकाबंदी करून 55 वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 36 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.