लातूर लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा सुधाकर रंगराव धुमाळ यांचा राधिका मंगल कार्यालय लातूर येथे दिनांक 7जुलै 2024 रोजी रविवारी सेवापूर्ती स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एन केंद्रे राजमाता जिजामाता महाविद्यालय लातूर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे नूतन खा.डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार श्री विक्रम काळे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर डॉ. सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर लातूर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार, नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे कार्यक्रमाचे संयोजक श्री चंद्रकांत बिराजदार माजी उपमहापौर तथा रुद्रेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने
म.न पा सदस्य श्री दीपक मठपती, शोभाताई पाटील ,माजी सभापती राजकुमार जाधव ,श्री गिरीश पाटील प्रा.दत्ता सोमवंशी रिलायन्स एज्युकेशनचे उमाकांत होनराव प्राचार्य अशोक गवते सत्कारमूर्ती श्री प्रा. सुधाकर धुमाळ व त्यांच्या सौ निर्मलाताई धुमाळ व ज्येष्ठ धुमाळ परिवाराचे सदस्य व्यंकटराव धुमाळ हे व्यासपीठावर प्रमुखातिथी म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सुधाकर धुमाळ मित्रपरिवार व रुद्रेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच सत्कारमूर्ती प्राध्यापक सुधाकर धुमाळ व सौ निर्मलाताई धुमाळ यांचा सर्वांच्या वतीने फेटा शाल श्रीफळ पूर्ण भरते रवा आहेर देऊन त्यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आलाा.
त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रा.सुधाकर धुमाळ सर यांच्या कार्याविषयी गुणगौरव करत असताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. शिवाजीराव काळगे यांनी प्रा. धुमाळ सर यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार काढून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या व यापुढे त्यांनी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन कार्य करत राहावे असे आव्हान केले.
याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनीही मार्गदर्शन करून धुमाळसरांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्री चंद्रकांत बिराजदार यांनी केले तसेच याप्रसंगी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर श्री अजित माने प्रा.संजय भंडारी सरांची कु डॉ.प्रांजली धुमाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सत्काराला उत्तर देत असताना सत्कारमूर्ती प्रा. सुधाकर धुमाळ सरांनी आपल्या प्रती केलेल्या सत्कार बद्दल व आपणाला ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये सर्व कार्यामध्ये मदत केली त्या सर्वाबद्दल ऋण व्यक्त करून आपण यापुढेही असेच समाजकार्यांमध्ये सक्रिय राहून समाजाची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला..
कार्यक्रमांसाठी सर्व मित्रमंडळी राजमाता जिजामाता कॉलेजमधील सर्व स्टाफ व त्यांचे सहकारी रुद्रेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . तसेच प्राचार्य अशोक गवते पाटील लोहा डॉ.प्रा.विलास इंगळे उमरगा प्रा. डॉ.डी के देशमुख सीईटी प्रमुख राजश्री शाहू कॉलेज लातूर विद्या आराधनाचे प्रा. सतीश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अनेक संस्थेच्या माध्यमातूनही प्राध्यापक धुमाळ सर यांचा यथोचित सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील यांनी केले तर आभार संजय किरनाळे यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली