श्री गणेश मंदिरामुळे कुरोलीच्या वैभवात भरः विठ्ठलस्वामी महाराज
सिदेश्वर कुरोली
प्रतिनिधी:- मिलिंदा पवार
वडूज खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली गावास मोठा धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे. या गावात जागृत शिवमंदिर तसेच परमहंस यशवंत बाबा आश्रम ही दोन पवित्र देवालये आहेत. याच पंक्तीत आता नूतन गणेश मंदिराचा समावेश झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे, असे मत वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी व्यक्त केले.
नूतन मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मूर्ती प्रतिष्ठापने अगोदर पुण्याहवाचन, मूर्ती व कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सकाळी वेदशास्त्री राजेंद्र वाडेकर, ह. भ. प. अभिषेक जोशी, शिरीष जोशी यांनी पौरोहित्य केले. या दरम्यान वडूज, कुरोली, धकटवाडी येथील भजनी मंडळांची सुश्राव्य भजने तसेच दुपारी ह. भ. प. विलास गरवारे
यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सांयकाळी वडूज येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळांची सुश्राव्य भजने झाली. संपूर्ण दिवसभर उपस्थित सर्व भाविक-भक्तांना राज्य कर अधिकारी डॉ. किर्तीराज जाधव यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
प्रतापराव देशमुख, शशिकला देशमुख, अमृतराव देशमुख, प्रसन्ना देशमुख, मनोज देशमुख, अमित देशमुख यांनी स्वागत केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, काँग्रेसचे राज्य सचिव रणजितभैय्या देशमुख, माझी सभापती संदीप मांडवे, प्रा. कविता म्हेत्रे, डॉ. प्रियांका माने, पृथ्वीराज गोडसे, डॉ. महेश माने, धनंजय क्षीरसागर, धर्माजी मांडवे, ॲड. शिवाजीराव जाधव, डॉ. विवेक देशमुख, राजाराम देशमुख, विजय शेटे, पांडुरंग भोईटे, चंद्रसेन देशमुख, अंकुश पांडोळे, सोमनाथ साठे, सुनिल मिसाळ आदीसह शेकडो मान्यवरानी भेट देत संयोजकांचे कौतुक केले.