मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े)
दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केली.
राजा ढाले म्हणजे मूर्तिमंत बंडखोरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्यायाच्या प्रवाहातून तावून सुलाखून निघालेला तत्त्वज्ञ. १९७० च्या दशकात आधी साहित्यातून त्यांनी आपल्यातील बंडखोरीची पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून दिली. कालकथित राजा ढाले पँथर यांनी ४० वर्षे पूर्वी रमाबाई आंबेडकर हे नाव एका आदर्श स्त्रीचे असून त्या नावाला साधेसे से वर्तन असणारे नगर निर्माण व्हावे या हेतूने व बौध्द धम्माचा निशुल्क प्रसार आणि प्रचार करण्याचा निस्वार्थ भावना ठेवून गंधकुटी विहाराची स्थापना केले असल्याचे यावेळी डॉ. राऊत यांनी म्हंटले.
या विहाराच्या बांधकामापासून ते आजतागायत डागडुजीसाठी लागणारा खर्च स्वतः राजा ढाले व त्यांची पत्नीने केलेला आहे. समाज सेवेच्या हेतूने त्यातून कोणतेही उत्पन्न न घेण्याचा त्यांचा मानस आजतागयत कायम आहे. २८ जून २०२४ रोजी झालेल्या घटनेत ढाले कुटुंबियाने स्थापित केलेली भगवान गौतम बुद्धांची मुर्तीही गायब करण्यात आली आहे. सदर बुध्द विहारचे सर्व कागदपत्रे राजा ढाले व त्यानंतर दिक्षा ढाले यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे डॉ. राऊत यांनी सभागृहात सांगितले.
यावेळी बोलतांना दिंगम्बर पाईकराव या ठेकेदाराने ने कुठलीही शासनाची परवानगी न घेता विहाराची तोडफोड करुन नुकसान केले आहे. घडलेल्या घटनेची तक्रार पंतनगर पोलिस स्टेशन यांना केली असता तक्रारीची नोंद घेण्यात आलेली नाही. प्रसंगी सदर ठेकेदारांसह यात सहभागी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विधिमंडळात डॉ.राऊत यांनी केली.
आज दीक्षाभूमीची पाहणी करणार
1 जुलै रोजी नागपूरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज दिनांक ६ जुलै ला सायं. ५ वाजता राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत भूमिगत पार्किंगच्या स्थळाकरिता पाहणी करुन संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगच्या मुद्दा डॉ. राऊत यांनी विधानसभेत लावून धरला होता. दरम्यान, याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दिक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केली. दरम्यान शनिवारी नागपूर येताच दीक्षाभूमी येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत.