केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील ‘सहवासातले आठवले ‘ पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि.३० —
मी तसा कुणाचाही नाही हस्तक
म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक
माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली.
डॉ बाबासाहेब नसते तर आम्ही कुठेच नसतो . आंबेडकरी विचारांवर निष्ठा ठेवून भारतीय दलित पँथर द्वारे आम्ही सातत्याने संघर्ष केला.त्या चळवळीत माझ्या सोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले,ही जी कार्यकर्त्यांचे ताकद आहे तीच माझी संपत्ती आहे . कमावलेली माणुसकी आणि माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठवले साहेबांच्या वरील पुस्तक लेखनाच्या उपक्रमाचे कौतुक करत असताना सर्वंकष अशा दलित चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या रामदास आठवले यांचं खूप कौतुक केलं.
त्याच पद्धतीनं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपला जुना मित्र रामदास आठवले यांच्या संघर्षातील आणि मंत्री असतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या आणि उपस्थित असणारे गाव खेड्यात जिल्ह्यात आख्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी जनता हीच रामदासजीची संपत्ती आहे,अशा शब्दांत कौतुक करून येणाऱ्या कालखंडात त्यांचा इतिहास पुस्तक रूपाने लोकांना वाचायला मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
तसेच आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले हे एक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देणार विद्यापीठच आहे असं नमूद करून कृतीशील कार्यकर्ते आठवले साहेबांसारखे व्हावेत ही भावना कवितेतून सांगितली आणि आम्ही आठवले साहेबांच्या कडे पाहत घडलो असेही नमूद केले
वरळी येथील नेहरू तारांगण येतील एका सभागृहात काल शनिवारी दि.२९ जून रोजी रात्री सहवासातले आठवले या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
माजी मंत्री अविनाश महातेकर, जेष्ट साहित्यिक शरणकुमार लिंबाळे , उद्योजक मंदार भारदे यांनीही आठवले साहेबांच्या सहवासातील अनेक आठवणीचा उजाळा देत पुस्तकात नमूद असलेल्या काही महत्त्वपूर्ण लेखांचा संदर्भ देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भदंत महाथेरो राहुल बोधी, सौ.सीमाताई आठवले, प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, बाबूराव कदम, गौतम सोनवणे, सुरेश बारर्शीग, दयाल बहादुरे, सिद्धार्थ कासारे, पप्पू कागदे , श्रीकांत भालेराव, आशाताई लांडगे, चंद्रकांत सोनकांबळे, उषाताई रामलू तसेच रिपब्लिकन पक्षातील नेते आणि कार्यकर्ते तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि आठवले साहेबांचे कुटुंबीय उपस्थित होते.
सहवासातले आठवले हे पुस्तक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल लिहिलेले अनुभव आहेत. त्याचे लेखन संकलन चंद्रमणी जाधव आणि प्रवीण मोर यांनी या पुस्तकात केले आहे.