6 जण ताब्यात एक फरार,पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
रायगड (धम्मशील सावंत ) गोवंश जातीच्या कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी मंगळवारी (ता. 18) उन्हेरे फाटा येथे पकडले आहे. बुधवारी (ता. 19) पाली पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात पैकी 6 जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.
या आरोपींना पकडण्यात गोरक्षकांनी पोलिसांना सहाय्य केले. या गुन्ह्यात गाडीचा चालक उदय हरी राणे वय 45 रा. खांब ता. रोहा, मैनुनद्दीन आदम कुरेशी वय 37 रा. वाकण कुरेशी नगर पाटणसई रोहा, हसन आदम कुरेशी वय 32 राहणार वाकण कुरेशी नगर पाटणसई ता. रोहा, मुजफ्फर इकबाल पानसरे वय 33 मीरानगर नागोठणे ता. रोहा आफताब अख्तर वय वर्ष 33 मीरानगर नागोठणे ता. रोहा, मजहर युनूस खान 35 वर्षे आझाद नगर रोहा, दानिश राहणार अधिकारी मोहल्ला नागोठणे तालुका रोहा यांचा समावेश आहे. दानिश हा फरार झाला आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलीस ऋषिकेश कृष्णा थळे यांनी पाली पोलीस स्थानकात दिली.
यावेळी पोलिसांनी पाच लाख रुपयांची एक सफेद रंगाची एर्टिगा कार, 600 रुपयांचा एक स्टीलचा डबा ज्यामध्ये एकूण पाच पिशव्या असून त्यांचे वजन 4.800 ग्राम भरले. तसेच डब्यासह पिशवीतील मांसाचे वजन पाच किलो 900 ग्रॅम भरले, पाचशे रुपये किमतीचा एक सफेद रंगाचा आईस बॉक्स मध्ये पाच काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये मांस असून त्याचे वजन चार किलो 400 ग्राम भरले.
आईस बॉक्स पिशवीतील माणसांचे वजन चार किलो 820 ग्राम भरले. असे एकूण पाच लाख एक हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव अतिरिक्त कार्यभार पाली पोलिस ठाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. भोईर हे करत आहेत.