उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आभार पत्र देऊन सन्मान
रायगड : धम्मशील सावंत
उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेऊन गाळ काढण्यासाठी यश ही आले,पावसाळा सुरु झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवावे लागले
उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण 63व्यक्ती आणि सामाजिक संघटना,पत्रकार यांचे आभार माणण्याचा कार्यक्रम उमटे धरणावरच संघर्ष ग्रुपच्या वतीने आयोजीत केला होता.
उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न हा संपूर्ण रायगड जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला,उमटे धरण संघर्ष समितीच्या संघर्षाला यश येताना दिसत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत उमटे धरणाचा गाळ काढण्यास प्रशांत नाईक,चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ,सुरेंद्र म्हात्रे,अँड,प्रवीण ठाकूर,अँड,मानसी म्हात्रे,अँड,सुहास कारुळकर जितेंद्र गोंधळी,हर्षदा मयेकर,सचिन राऊळ अँड,निहा राऊत जगदीश पाटील,प्रसाद वर्तक,अतिश पाटील,अमोल नाईक,अप्पा पालकर,सुधीर चेरकर,जयवंत ठाकूर,धरणावर गेल्यावर जेवण देणारे प्रकाश काका झावरे आणि त्यांची टीम,तसेच उमटे धरणावर जी यंत्र सामुग्री ठेवली होती.
तिचे रात्री सरक्षण करणारे सुदाम झावरे,अमर ठाकूर दादा,व आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारीयांनी गाळ काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला,त्यांचे उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आल्याचे संघर्ष ग्रुपचे अँड,राकेश पाटील यांनी मत व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की आम्ही मदतीसाठी हात पुढे केला आणि असंख्य हात मदतीसाठी निःस्वार्थी पणे पुढे आले,एका व्हाट्स ऍप ग्रुपवरच्या चॅटिंग वर उमटे धरणाच्या गाळ काढण्यासाठी मदत मिळू शकते हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे,आहोत.
. पत्रकार धम्मशील सावंत आपल्या भाषणात म्हणाले की,पाण्यासारख्या विषयावर अजूनही संघर्ष करावा लागतो आहे ही खुप मोठी शोकांतिका आहे,छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाकडे नेहमीच लक्ष देऊन स्वराज्य जपलं,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पाण्यासाठीचा चवदार तळ्याचा लढा तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे,
अँड सुहास कारुळकर म्हणाले की,ही पाण्यासाठीची लढाई आम्ही आत्ता लढणार आहोत. चित्रलेखा पाटील म्हणाल्या की,उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अभिनंदन त्यांनी चांगल्या रीतीने गाळाच्या प्रश्नाला हाताळले,सर्व राजकीय नेत्यांना एकत्र करून काम करून घेणे ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे.
त्यांनी भाषणाच्या वेळी दिलीप भोईर,सुरेंद्र म्हात्रे,जितेंद्र गोंधळी,व इतर मदत करणाऱ्यांचेही आभार मानले,
दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ म्हणाले की,उमटे धरणाचा गाळ काढण्यास सुरुवात जरी झाली असली तरी खुप मोठ्या प्रमाणात गाळ अजूनही धरणात आहे,उमटे धरण संघर्ष ग्रुपला आज पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. पण सरकारी यंत्रणा जाणीवपूर्वक या धरणाकडे कानाडोळा करीत आहे,पावसाळ्या नंतर पुन्हा एकदा याच जोशात उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी आम्ही धरणात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गावंड,आणि रुपेश पाटील यांनी केले,अँड राकेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले,