सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ आग्निविर योजना कायम स्वरुपी बंद होणार
– (प्रशांत कदम माजी सैनिक)
लोकशासन न्युज विशेष वृत्त
कुलदीप मोहिते सातारा
सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन व वंचीत बहुजन आघाडीने 2024 सातारा लोकसभेला माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी दिल्या मुळे अग्निपथ अग्नीविर योजने संदर्भात प्रचारामध्ये अडचणी मांडल्या होत्या व ही योजना कायम स्वरुपी बंद करावी असे जाहीर नाम्यामध्ये प्रामुख्याने नमूद केले होते. व याचे पडसाद सर्व देशांमध्ये व राज्यांमध्ये उमटले होते.
आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले आहे परंतु स्वतःच्या पक्षाकडे बहुमत नसले मुळे बिहार राज्याचे जनता दल (युनायटेड)चे नेते मा.नितीश कुमार यांनी समर्थन दिले व भारतीय जनता पक्षाला अट्ट घातली आहे की अग्नीवर अग्निपथ योजना कायमस्वरूपी बंद करावी .व ही सातारा जिल्ह्यातील आजी/माजी सैनिक व शेतकरी ,शोषित, बहुजनांची जीत आहे
भारतीय सेनेमध्ये भरती होणारा व भारतीय सीमेचे रक्षण करणारा हा एक सैनिकाचा मुलगा व शेतकऱ्याचा, वंचित , अल्पसंख्याक,बहुजनांचा मुलगा असतो व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब हे स्वतः जम्मू-काश्मीरच्या सीमेवर जाऊन सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
2024 लोकसभेला महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने माजी सैनिकांना उमेदवारी दिली नाही. परंतु सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी सैनिकांचा प्रतिनिधी लोकसभेत गेला पाहिजे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणुन त्यांनी सेवारत सैनिक, माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबिय यांच्या हक्कासाठी एका सर्वसामान्य माजी सैनिकाला शूरवीरांच्या, महापुरुषांच्या सातारा जिल्ह्यामध्ये व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे संरक्षण मंत्री यांच्या कराड तालुक्यातील माजी सैनिक प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांना 2024 सातारा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली कारण सैनिकांच्या समस्या या देशाच्या सीमेचे रक्षण करणारा एक सैनिकच मांडू शकतो म्हणून त्यांनी उमेदवारी देऊन सर्व सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील,देशातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. व राजकीय पटलावर वेगळी ओळख माजी सैनिकाची करून दिली, यासाठी सर्व सैनिक व त्याच्या कुटुंबीयांनी हे आपल्या स्मरणात ठेवणे गरजेचे आहे.
ही उमेदवारी दिल्यामुळे सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय व शेतकरी, वंचित,अल्पसंख्यांक, बहुजन यांच्या समस्या अडचणी व खास करून अग्निपथ योजना कायम स्वरुपी बंद करावी व युवा वर्गाला न्याय्य मिळावा या समस्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मांडू शकलो व या मुळे आज न्याय मिळत आहे. हे यश आहे.
जरी सातारा लोकसभा निवडणूक हरलो असलो तरी सैनिक,शेतकरी,बहुजन,युवा वर्गाच्या हक्काची लढाई जिंकली आहे. सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारला व सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी ना खडबडून जागे करण्याचे काम केले आहे नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांना सातारा जिल्ह्याच्या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये सैनिकांन विषयी पंधरा मिनिटे बोलावे लागले आहे व भारतीय जनता पार्टीला सैनिकांचा मेळावा निवडणुकी दरम्यान घ्यावा लागला ही सातारा जिल्ह्याच्या आजी /माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व शहीद जवान कुटुंबियांची जीत आहे
सातारा जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक हा सातारा जिल्ह्यातील जनतेच्या व सिनिकांच्या हककासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यास कायम सज्ज आहे
सातारा जिल्ह्यातील सर्व मतदाराचे आभार
आपणा सर्वांना आपल्या हक्काची लढाई लढायची असेल तर सर्वानी संघटित होणे एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
असे मत लोकशासनला दिलेल्या खास मुलाखतीत माजी सैनिक प्रशांत कदम यांनी मांडले आहे.