Satara I शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट.

शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट.

संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी-शिंगणवाडीचे सरपंच शंकरराव पवार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

चाफळ ता पाटण: प्रतिनिधी श्रीकांत जाधव 

 

शिंगणवाडी ता. पाटण येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक त्रुटी असूनही त्या पूर्ण केल्याशिवाय त्या ठेकेदाराची बिले अदा करू नयेत. रस्त्याचे काम उरकण्याचा घाट घालणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी शिंगणवाडीचे सरपंच शंकरराव पवार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान कामे करण्याची १५ मे ही डेडलाईन असतानाही संबंधित ठेकेदाराने १५ मे नंतर या रस्त्यावर कारपेट टाकण्याचे काम सुरू केले आहे. याचीही चौकशी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी पवारांनी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, चाफळ ते शिंगणवाडी रस्त्याचे काम पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहे. रस्त्याच्या कामाचा पहिला स्तर झालेला आहे. परंतु ठेकेदाराने परंतु ठेकेदाराने अनेक त्रुटी राखत रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील रस्त्याकडेच्या गटारांची काम अद्याप केलेली नाही. त्यामुळे सुरू असलेल्या वळिवाच्या पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरून नुकसान होत आहे. यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाले काढलेली माती शेतकऱ्यांच्या रानात तशीच पडून आहे. ती एकतर उचलून बाहेर टाकावी किंवा शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार ती रानात पसरवून देणे आवश्यक होते. तरीही ठेकेदाराने रस्त्याच्या शेवटच्या स्तराचे काम चालू केल्याने, ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना कराव्यात असेही निवेदनात सरपंच पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *